IPL 2023 Auction Ben Stokes : अखेर चेन्नईला 16.25 कोटीत मिळाला एमएस धोनीचा वारसदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 Auction Ben Stokes

IPL 2023 Auction Ben Stokes : चेन्नईने बेन स्टोक्सला 16.25 कोटीत खरेदी करत एका दगडात मारले दोन पक्षी

IPL 2023 Auction Ben Stokes : बेन स्टोक्ससाठी लखनौ सुपर जायंट आणि सनराईजर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरूवात केली. त्यांनी इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराला 15 कोटींपर्यंत नेले. त्यानंतर चेन्नईने लिलावात उडी घेतली. अखेर सीएसकेने 16.25 कोटीला त्याला खरेदी केले. चेन्नईने बेन स्टोक्सला खरेदी करून एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी अष्टपैलू सॅम करनची उणीव भरून काढलीच याचबरोबर एमएमस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्न कोण करणार हा प्रश्नही सोडवला.

बेन स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. तो इंग्लंडच्या टी 20 संघातील एक महत्वाचा खेळाडू देखील आहे. जरी त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो भारतात होणाऱ्या वर्ल्डकपपूर्वी निवृत्तीतून बाहेर देखील येऊ शकतो.

हेही वाचा: IPL 2023 Auction Live : बेन स्टोक्स चेन्नईकडे, सॅम करनची जागा काढली भरून

भारताच्या कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर अनसोल्डचा शिक्का बसता बसता वाचला. त्याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने बेस प्राईस 50 लाखाला विकत घेतला. गेल्या काही दिवसांपासून बॅडपॅचमध्ये असलेल्या अजिंक्यने रणजी ट्रॉफीमध्ये दोनच दिवसांपूर्वी द्विशतकी खेळी केली. त्याचाच बहुदा फायदा अजिंक्यला लिलावात झाला असावा.

हेही वाचा: IPL 2023 Auction Ben Stokes : अखेर चेन्नईला 16.25 कोटीत मिळाला एमएस धोनीचा वारसदार

चेन्नई सुपर किंग्जने यापूर्वी कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजाराला देखील असचा लिलावात हात दिला होता. त्यालाही बेस प्राईसला खरेदी करत भारतीय कसोटी संघातील मोठमोठ्या खेळाडूंवर अनसोल्डचा शिक्का बसू नये म्हणून सीएसकेने त्यांना खरेदी केले.

यंदाच्या लिलावात पहिलेच नाव इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचे होते. त्याला सनराईजर्स हैदराबादने तब्बल 13.25 कोटीला खरेदी करत लिलावाचा नारळ दणक्यात फोडला. त्यानंतर हैदराबादने पंजाब किंग्जचा माजी कर्णधार मयांक अग्रवालसाठी देखील 8.25 कोटी रूपये खर्च केले.