Eoin Morgan | सीएसकेच्या स्टार खेळाडूने मॉर्गनची तुला थेट धोनीशीच केली

Chennai Super Kings Player Moeen Ali Compare Eoin Morgan Captaincy With MS Dhoni
Chennai Super Kings Player Moeen Ali Compare Eoin Morgan Captaincy With MS Dhoniesakal

लंडन : इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने (Eoin Morgan) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर जगभरातील क्रिकेटपटू आणि जाणकारांनी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. मॉर्गनच्या नेतृत्वाखालीच इंग्लंडने 2019 ला पहिल्यांदा वनडे क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन (Moeen Ali) अलीने देशाचा सर्वात चांगला व्हाईट बॉल कर्णधार (Captaincy) असे म्हणत मॉर्गनची स्तुती केली.

Chennai Super Kings Player Moeen Ali Compare Eoin Morgan Captaincy With MS Dhoni
AUS vs SL: रन आऊट होताच स्टिव्ह स्मिथ ख्वाजावर भडकला

मोईन अली इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन आणि चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी या दोघांच्याही नेतृत्वाखाली खेळला आहे. त्याने या दोघांच्या नेतृत्व शैलीची तुलना केली. त्याच्या मते या दोघांच्या नेतृत्व शैलीत फारसा फरक नाही. स्पोर्ट्स तकशी बोलताना मोईन अली म्हणाला की 'मी मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. मी धोनीच्याही नेतृत्वाखाली खेळलो आहे. दोघांच्याही शैलीत फारसा फरक नाही. शांत, आपल्या खेळाडूंसाठी प्रामाणिक असण, दमदार कर्णधार, दमदार खेळाडू.'

अली पुढे म्हणाला की, 'मॉर्गनने इंग्लंडला अंधारातून बाहेर काढून चांगले दिवस दाखवले. यापूर्वी आम्ही व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये एक सुमार संघ होतो. त्याने खेळाडूंची मानसिकता बदलली. इंग्लंड ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळत आहे ते मॉर्गनमुळेच. त्याने दाखवून दिले की जर तुमची मानसिकता असेल तर तुम्ही धाडसी होऊन क्रिकेट खेळता. सध्या इंग्लंड अशाच प्रकारे क्रिकेट खेळत आहे. तो आमचा आतापर्यंतचा सर्वात महान व्हाईट बॉल क्रिकेटमधला कर्णधार आहे.'

Chennai Super Kings Player Moeen Ali Compare Eoin Morgan Captaincy With MS Dhoni
Wimbledon 2022 | सौंदर्याची खाण एमा विंबल्डनच्या दुसऱ्याच फेरीत गारद

इंग्लंडचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आतापर्यंतच्या वाटचालेचे यश मॉर्गनला दिले जाते. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 ला वनडे वर्ल्डकप जिंकला होता. तर 2016 ला देखील टी 20 वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत मजल मारली होती. 35 वर्षाच्या मॉर्गनने 2006 मध्ये आयर्लंडकडून वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर चार वर्षांनी 2009 मध्ये त्याने इंग्लंडकडून खेळण्यास सुरूवात केली. मॉर्गनने 225 वनडे आणि 115 टी 20 सामने खेळले आहेत. इंग्लंडकडून व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्यानेच सर्वाधिक सामने खेळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com