

D Gukesh
sakal
समरकांड (उझबेकिस्तान) : भारताच्या दोन विश्वविजेत्या खेळाडूंमध्ये शुक्रवारी बुद्धिबळाच्या पटावर कमालीची झुंज पाहायला मिळाली. पुरुष विभागातील विश्वविजेता डी. गुकेश व महिला विभागातील विश्वविजेती दिव्या देशमुख यांच्यामध्ये फिडे ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धेतील आठव्या फेरीची लढत १०३ चालींनंतर बरोबरीत राहिली.