

D Gukesh
sakal
पणजी : जगज्जेता भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याचे फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. शनिवारी दुसऱ्या डावात त्याला फ्रेडरिक स्वेन याने पराभूत केले, त्यामुळे गुकेशला जागतिक अजिंक्यपदानंतर विश्वकरंडक जिंकणे शक्य झाले नाही. अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद, पी. हरिकृष्ण व जागतिक ज्युनियर विजेता व्ही. प्रणव यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.