Chetan Sharma Resignation : अखेर वाचाळवीर चेतन शर्मांनी दिला राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Sharma Resignation

Chetan Sharma Resignation : अखेर वाचाळवीर चेतन शर्मांनी दिला राजीनामा

Chetan Sharma Resign : स्टिंग ऑपरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निवडसमिती चेअरमन चेतन शर्मांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी राजीनामा स्विकारला आहे.

चेतन शर्मा यांना भारतीय वरिष्ट पुरूष संघाच्या निवडसमितीचे अध्यक्षपद भुषवण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली होती. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील भारताच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मांची निवडसमितीच बर्खास्त केली होती. मात्र दुसरी निवडसमिती नियुक्त करताना आश्चर्यकारकरित्या चेतन शर्मांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना निवडसमिती अध्यक्ष देखील करण्यात आले.

मात्र स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या चेतन शर्मांचा आपल्या तोंडावर ताबा राहिला नाही. त्यांनी निवडसमिती आणि बीसीसीआयमधील पडद्यामागील गुपितं उघड केली. त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहलीमधील वादाबाबत, संघातील दुखापतग्रस्त खेळाडू इंजक्शन घेऊन लवकरात लवकर भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतात अशी वक्तव्ये केली होती.

याचबरोबर त्यांनी आपल्याशिवाय टीम इंडियाचे पान हलत नाही. रोहित - हार्दिक हे आपल्याला लाडीगोडी लावत असतात अशा अविर्भावात अनेक वक्तव्ये केली होती. यानंतर त्यांचावर कारवाईची टांगती तलवार लटकत होती. अखेर बीसीसीआयने त्यांना पत्ता कट केला.

(Sports Latest News)

टॅग्स :CricketBCCIJay Shah