पुजाराचा खुलासा! ...तर मी फक्त नेटमध्ये बॅटींग केली असती

...तर मी फक्त नेटमध्ये बॅटींग केली असती, चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली खंत
Cheteshwar Pujara back in India squad
Cheteshwar Pujara back in India squad

Cheteshwar Pujara Back In India Squad: कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे ही जोडी टीम इंडियाची मिडल ऑर्डरची जबाबदारी पाहात होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर या दोघांनाही टीम इंडियातून वगळण्यात आले. पुजारा आणि रहाणे हे दोघं फॉर्म मिळवण्यासाठी रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत होते. आता 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरूद्धच्या एकमेव टेस्टसाठी पुजारानं टीम इंडियात पुनरागन केलंय. तर राहणेला संधी मिळालेली नाही.

Cheteshwar Pujara back in India squad
Women T20 Challenge : माया सोनवणेची अतरंगी बॉलिंग अ‍ॅक्शन व्हायरल

भारतीय कसोटी संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी पुजाराला संघात समावेश करून घेतले आहे. चेतेश्वर पुजारा खूप आनंदी दिसत आहे. चेतेश्वर पुजारा बराच काळ खराब फॉर्मशी झुंज देत होता. त्यामुळे त्याने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्ससाठी सात डावांत चार शतके झळकावली, आणि दरम्यान द्विशतकेही केलं आहे. पुजारा त्याच्या फॉर्ममध्ये परतला दिसत आहे. त्यामध्ये पुजाराने एक मोठा खुलासा केला आहे.

Cheteshwar Pujara back in India squad
सायकल मोडली म्हणून ४० किलोमीटर पायी जायचा, भारतीय संघात झालीय निवड

चेतेश्वर पुजारा म्हणाला जर माझी आयपीएलमध्ये निवड झाली असती, तर मला कोणताही सामना खेळण्याची संधी मिळाली नसती. आयपीएलमध्ये मला फक्त नेटमध्ये जाऊन सराव करून परत यावं लागलं असत. सामन्यात फलंदाजी करणे आणि नेटमध्ये सराव करणे वेगळे आहे. जेव्हा मला काउंटीमध्ये खेळण्याची ऑफर आली तेव्हा मी लगेच हो बोलो. कौंटी क्रिकेट खेळण्याचे माझे मुख्य कारण होते फॉर्ममध्ये परत येणे.

Cheteshwar Pujara back in India squad
एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा! पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये परतणार

दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर पुजारा आणि रहाणे यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली होती. चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेले पाहून. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकमेव सामन्यासाठी चेतेश्वर पुजारा भारतीय संघात घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com