Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराला लॉर्ड्सवर मिळाले 'स्टँडिंग ओवेशन'

Cheteshwar Pujara Double Century In  Got Standing Ovation In Lords
Cheteshwar Pujara Double Century In Got Standing Ovation In Lordsesakal

नवी दिल्ली : भारताचा कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यंदाचा काऊंटी हंगाम (County Cricket) गाजवत आहे. ससेक्सकडून खेळणाऱ्या पुजाराने हंगामातली आफले पाचवे शतक ठोकले. हीच खेळी त्याने पुढे नेत या शतकाचे रूपांतर द्विशतकात केले. पुजाराने हे द्विशतक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर मिडिलसेक्सविरूद्ध (Sussex vs Middlesex) ठोकले. त्याने 403 चेंडूंचा सामना करत 231 धावा केल्या. द्विशतक ठोकून बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना लॉर्ड्सवरील प्रेक्षकांनी पुजाराला स्टँडिंग ओवेशन दिले.

Cheteshwar Pujara Double Century In  Got Standing Ovation In Lords
आजही विराट इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी घेतो 8 कोटी, कमाईत आशियामध्ये अव्वल

पुजाराने द्विशतक ठोकताच त्याचे संघ सहकारी गॅलरीत उभे राहून टाळ्या वाजवू लागले. टीम मुर्ताघच्या चेंडूवर पुजाराने फटका लगावात आपले द्विशतक पूर्ण केले. यानंतर ज्यावेळी पुजारा लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये परतत होता. त्यावेळी लॉर्ड्सच्या कॉरिडोरमध्येही पुजाराला स्टँडिंग ओवेशन मिळाले. याबाबतचे फोटो लॉर्ड्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या पोस्टला 'लॉर्ड्सवर चेतेश्वर पुजाराने 231 धावा केल्या. एक लक्षात राहणारी खेळी.' असे कॅप्शन दिले.

चेतेश्वर पुजाराने ससेक्सचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात द्विशतक ठोकले. त्याच्या या द्विशतकामुळे मिडिलसेक्स विरूद्धच्या काऊंटी सामन्यात ससेक्स मजबूत स्थितीत पोहचला. पुजाराने आज सकाळी 115 धावांवर पुढे खेळण्यास सुरूवात केली. त्याने 403 चेंडूत 231 धावा केल्या. यात 21 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. पुजाराने या हंगामात ससेक्सकडून तिसरे द्विशतक ठोकले.

Cheteshwar Pujara Double Century In  Got Standing Ovation In Lords
Video : इसरलंय! बॅड्समन पॅड्स न घालताच मैदानात

या खेळीबरोबरच चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या 18,000 धावा देखील पूर्ण केल्या. ससेक्सने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पहिल्या डावात 523 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने हंगामात ससेक्सकडून चांगली कामगिरी केल्यामुळेच त्याला भारतीय कसोटी संघात पुन्हा स्थान मिळाले होते. पुजाराने डरहम विरूद्ध 203 तर डर्बीशायरविरूद्ध 201 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com