
द्विशतकी खेळी करणारा पुजारा ससेक्ससाठी 'लक्ष्मण' ठरतोय
भारताचा कसोटी संघातील अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आपल्या काऊंटी क्रिकेटची (County Championship) धडाक्यात सुरूवात केली. त्याने पदार्पणाच्या सामन्यात दुसऱ्या डावात शकत (Century) ठोकले. ससेक्स (Sussex) विरूद्ध डर्बीशायर (Derbyshire) या सामन्यात दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी करून ससेक्सला दुसऱ्या डावात आघाडी मिळवून दिली. पुजाराने आपल्या खेळीत पूल शॉटचा चांगला वापर केला. त्याने डर्बीच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. ज्याप्रमाणे व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना फॉलो ऑननंतर जिंकून दिला होता. तशाच प्रकारची खेळी सध्या चेतेश्वर पुजारा करत आहे.
हेही वाचा: दिनेश कार्तिकची टीम इंडियात वापसी? काय म्हणाला विराट
डर्बीशायरने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव 8 बाद 505 धावांवर घोषित केला. यात शान मसूदने दमदार 239 धावांची खेळी केली होती. ससेक्सचा पहिला डाव 174 धावात गुंडळण्यात डर्बीशायरला यश आले होते. पहिल्या डावात पुजाराला फक्त 6 धावा करता आल्या होत्या. मात्र फॉलो ऑन (Follow On) मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात पुजाराने आक्रमक पवित्र्यात बॅटिंग करण्यास सुरूवात केली. त्याने प्रथम श्रेणीमधील आपले 51 वे शतक ठोकले. तो फक्त शतकावरच समाधानी झाला नाही तर त्याने आपली दीर्घ खेळी करण्याची वृत्ती दाखवून देत दीडशतकी मजल मारली. त्यानंतर त्याने या खेळीचे रुपांतर द्विशतकात केले.
हेही वाचा: VIDEO : मलिकने गुरूच्या हातावर मारला हात! 20 व्या षटकात 'काश्मिरी जलवा'
चेतेश्वर पुजाराला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. त्याला श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आले नव्हते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघाचा पुढची कसोटी मालिका ही इंग्लंड विरूद्ध होणार आहे. या दौऱ्यात भारत एकच कसोटी सामना खेळेल.
Web Title: Cheteshwar Pujara Hit Century In County Championship 2nd Inning After Getting Follow On
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..