
दिनेश कार्तिकची टीम इंडियात वापसी? काय म्हणाला विराट
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने (Royal Challenger Bagalore) दमदार सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यातील 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. आरसीबीच्या आतापर्यंतच्या यशात अनुभवी दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) मोठे योगदान दिले आहे. दिनेश कार्तिक स्लॉग ओव्हरमध्ये करत असलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान (Team India Comeback) मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता आरसीबीचा स्टार फलंदाज आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) याबाबत एक मोठं वक्तव्य केलं.
हेही वाचा: IPL Photo Story: छोट्या दिनेश कार्तिकनं जिंकली नेटकऱ्यांची मनं
दिनेश कार्तिक आरसीबीच्या संघात एक मॅच फिनिशरच्या भुमिकेत आहे. ही भुमिका तो चोखपणे पार पाडत आहे. त्याने सहा डावात 209.57 च्या स्ट्राईक रेटने 197 धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या सामन्यात तो फक्त एकदाच बाद झाला आहे. शनिवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी केली. आरसीबीने दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला. दरम्यान, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली दिनेश कार्तिकच्या या कामगिरीवर जाम खूष झाला आहे.
हेही वाचा: IPL बघण्यासाठी बांगलादेश बॉर्डरवर घुसखोरी; BSF ने एकाला घेतले ताब्यात
विराट कोहली म्हणाला की, 'मी इथं आयपीएलमधील सर्वोकृष्ट खेळाडूसोबत आहे. मी ही कामगिरी अशीच सुरू राहू दे असे देखील म्हणणार नाही कारण ही कामगिरी अशीच सुरू राहणार आहे हे मला माहिती आहे. तू भलत्याच फॉर्ममध्ये आहेस, मी हे पाहू शकतो. तुला पुन्हा बॅटिंग करताना पाहणे हा मी माझा सन्मान समजतो. आम्हाला विजय मिळवून दिल्याबद्दल आभारी आहे.' विराट म्हणाला की आरसीबीचा जुना संघ सहकारी एबी डिव्हिलियर्सला देखील कार्तिकच्या या मॅच फिनिशिंग खेळींचा गर्व वाटत असेल.
विराट पुढे म्हणाला की, 'डीके आपल्या उदिष्टांबाबत स्पष्ट आहे हे पाहून खूप आनंद झाला. मी नक्की सांगू शकतो की दिनेश कार्तिकने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. त्याची खेळी आता आरसीबीसाठी टी 20 क्रिकेट खेळण्यापर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. तर मला खात्री आहे की अनेक वरच्या स्तरावरील लोकं तुझ्या खेळीची दखल घेतील.' दिनेश कार्तिक भारताकडून 2019 च्या वर्ल्डकपमध्ये शेवटचा खेळला होता. दिनेश कार्तिक सध्या 36 वर्षाचा आहे. त्याने 2004 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 36 कसोटी, 94 वनडे आणि 32 टी 20 सामने खेळले आहेत.
Web Title: Virat Kohli Statement About Dinesh Karthik Indian Team Comeback
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..