
VIDEO : मलिकने गुरूच्या हातावर मारला हात! 20 व्या षटकात 'काश्मिरी जलवा'
मुंबई : आयपीएल 2022 च्या हंगामातील 28 व्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्जला 151 धावात रोखले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि युवा वेगवान गोलंदाज उम्रान मलिक (Umran Malik) यांनी भेदक मारा केला. भुवनेश्वर कुमारने 22 धावात 3 तर उम्रान मलिकने 28 धावात 4 बळी टिपले. विशेष म्हणजे उम्रान मलिक टाकलेल्या 20 व्या षटकात पंजाबच्या तब्बल 4 विकेट गेल्या. विशेष म्हणजे उम्रानने हे षटक निर्धाव टाकले.
हेही वाचा: दिनेश कार्तिकची टीम इंडियात वापसी? काय म्हणाला विराट
उम्रान मलिकने आपल्या वेगानं सर्वांनाच वेड लावलं आहे. सामन्यागणिक त्याच्या वेगात आणि विकेट्समध्ये वाढच होत आहे. आजच्या पंजाब विरूद्धच्या सामन्यात त्याने 20 वे षटक टाकत कमाल केली. त्याने हे षटक निर्धाव टाकले तसेच आरसीबीच्या 3 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये 20 वे षटक निर्धाव टाकणाऱ्यांच्या यादीत आता उम्रान मलिकचा तिसरा क्रमांक लागतो. या यादीत इरफान पठाण (Irfan Pathan) (PBKS vs MI, Mohali 2008), जयदेव इनाडकट (RPS vs SRH, Hyderabad 2017) या दोन भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. आता उम्रान मलिक देखील त्यांच्या पंक्तीत बसला आहे.
हेही वाचा: IPL 2022: काय सांगता! धोनी आजच्या सामन्यात करणार गोलंदाजी?
आजच्या सामन्यात उम्रान मलिकने दोन कॉट अँड बोल्ड विकेट देखील घेतल्या आहेत. आयपीएलच्या एका सामन्यात दोन कॉट अँड बोल्ड विकेट घेणारा उम्रान मलिक हा हरभजन सिंग (2011) नंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. पंजाबच्या बॅटिंगबद्दल बोलायचे झाले तर पंजाबची फलंदाजी ढासाळत असताना लिम लिव्हिंगस्टोनने 33 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याने या धावा 181.81 च्या स्ट्राईक रेटने केल्या. तर दुसऱ्या बाजूला पंजाबचा संपूर्ण संघाने 87 चेंडूत 96.55 स्ट्राईक रेटने 84 धावा केल्या.
Web Title: Umran Malik 20th Maiden Over Equals Mentor Irfan Pathan Record In Ipl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..