How much pension does Cheteshwar Pujara get after retirement : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने आज क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती दिली. त्याच्या या निर्णयानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. या निर्णयाने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अशातच आता या निर्णयानंतर पुजाराला निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन मिळणार का? ती किती असेल? याची चर्चाही सुरु झाली आहे.