IPL पासून दूर चेतेश्वर पुजारा इंग्लंडच्या थीम पार्कमध्ये करतोय धमाल | Cheteshwar Pujara Spending Quality Time With Family | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheteshwar Pujara Spending Quality Time With Family

IPL पासून दूर चेतेश्वर पुजारा इंग्लंडच्या थीम पार्कमध्ये करतोय धमाल

भारताचा कसोटी संघातील अव्वल फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) गेल्या काही दिवसांपासून काऊंटी क्रिकेटचं (County Cricket) मैदान गाजवत आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, इकडे भारतात आयपीएलची (IPL 2022) रणधुमाळी सुरू असताना, विराट कोहलीला ब्रेकवर पाठवण्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच चेतेश्वर पुजारा मात्र इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबासमवेत (Cheteshwar Pujara Family) क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे.

हेही वाचा: 'विराट अजून 6-7 वर्षे खेळायचं असेल तर IPL मधून बाहेर पड'

पुजाराने यंदाच्या काऊंटी हंगामात ससेक्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. काऊंटी क्रिकेट खेळत असतानाच दोन सामन्यातील निवांत वेळी तो आपली पत्नी (Cheteshwar Pujara Wife) आणि मुलीसह बर्कशायरच्या लेगोलँड (Legoland) या थीम पार्कमध्ये धमाल करत आहे. चेतेश्वर पुजाराने याबाबतचे फोटो कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत.

पुजारा इंग्लंडमध्ये ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळतो आहे. यादरम्यान इंग्लंडच्या बर्कशायरच्या लेगोलॅंड थीम पार्कमध्ये पत्नी आणि मुलीसह चेतेश्वर पुजारा काल धमाल करताना दिसला. याची माहिती त्याने स्वत: स्वदेशी सोशल मीडिया मंच, 'कू' अॅपच्या माध्यमातून दिली आहे. मंगळवारी पुजाराने पत्नी पूजा आणि मुलगी आदिती सोबतचे मजा करतानाचे फोटो शेअर केले आहे.

हेही वाचा: कोहली स्वतःची बिजनेस क्लास सीट अनुष्का ऐवजी गोलंदाजांना का द्यायचा?

भारतीय कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने स्थानिक क्रिकेट खेळण्यावर फोकस केला आहे. तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. संध्या आयपीएल सुरू असल्याने रणजी ट्रॉफीचे सामने आयपीएल संपल्यानंतर पुन्हा सुरू होणार आहेत. यादरम्यान, पुजाराने वेळ न दवडता काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगचे तंत्र तासून घेण्याचा निर्णय घेतला. काऊंटी खेळण्याचा पुजाराचा निर्णय योग्य ठरला त्याने काऊंटीमध्ये मोठ्या धावा करून निवडसमितीचे पुन्हा एकदा आपल्याकडे लक्ष वेधले.

Web Title: Cheteshwar Pujara Spending Quality Time With Family In Legoland

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top