Cheteshwar Pujara : रहाणे संघात येताच त्याच्या दोस्तानं देखील ठोकला शड्डू, इंग्लंडमध्ये धावांचा धुरळा

Cheteshwar Pujara Century In County Championship
Cheteshwar Pujara Century In County Championshipesakal

Cheteshwar Pujara Century In County Championship : बीसीसीआयने नुकतेच इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणाऱ्या WTC Final साठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली. या संघात भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने जवळपास 1 वर्षानंतर पुनरागमन केले. या पुनरागमनाचा जल्लोष त्याचा बॅटिंग पार्टनर चेतेश्वर पुजाराने इंग्लंडमध्ये साजरा केला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊन्टी चॅम्पियनशिप स्पर्धेत चेतेश्वर पुजाराने ससेक्सकडून शतकी खेळी केली.

Cheteshwar Pujara Century In County Championship
Vijay Shankar : शंकरने तिसरा डोळा उघडला, गुजरात शानदार विजयासह अव्वल स्थानावर विराजमान

चेतेश्वर पुजाराने ससेक्स आणि ग्लोसेस्टरशायर यांच्यातील सामन्यात पहिल्या डावात 238 चेंडूत 151 धावांची दीडशतकी खेळी केली. यात त्याने 20 चौकार आणि 2 षटकार ठोकले. चेतेश्वर पुजारा क्रीजवर होता तेव्हाच ससेक्सने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 408 धावा केल्या होत्या. पुजारा पाठोपाठ टॉम अल्सोपने 63 तर जेम्स कोलेसने 74 धावांची खेळी केली.

चेतेश्वर पुजाराचे हे काऊटी मधील काही पहिले शतक नाही. पुजाराने डरहॅमविरूद्ध पहिल्या डावात 163 चेंडूत 115 धावांची खेळी केली होती. यात त्याने 13 चौकार आणि 1 षटकार देखील मारला. काऊंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत पुजाराने 7 शतके ठोकली आहेत. त्याने आपले प्रत्येक अर्धशतक शतकात रूपांतरित केले आहे.

चेतेश्वर पुजाराचा हा फॉर्म इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या WTC Final सामन्यात कामी येणार आहे. पुजारा इंग्लंडमधील वातावरणात रूळलेला एकमेव फलंदाज असेल याचबरोबर आता त्याच्या जोडीला त्याचा जुना पार्टनर अजिंक्य रहाणे देखील असणार आहे. अजिंक्य रहाणेचे इंग्लंमधील रेकॉर्ड हे इतर फलंदाजांपेक्षा उत्तम आहे.

Cheteshwar Pujara Century In County Championship
Hardik Pandya Sunil Gavaskar : हार्दिक कॅप्टन्सीचा वारसा ठेवून... गावसकरांनी पांड्याला तर धोनीच्याच पंक्तीत बसवले

WTC Final साठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com