Asian Games 2026: चीनने शतक झळकावले! भारत पदकतालिकेत रेंगाळतोय; जपान, कोरिया, कझाकस्तानही पुढे; आपण कुठे आहोत?

Asian Games 2026 medal tally India latest update: आशियाई क्रीडा स्पर्धेत मध्ये पदकांसाठीची चुरस दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. चीनने स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व कायम ठेवत पदकतालिकेत मोठी आघाडी घेतली आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि कझाकस्तान हेही भारतापेक्षा पुढे आहेत.
Asian Games 2026 medal tally

Asian Games 2026 medal tally India latest update

esakal

Updated on

Asian Games 2026 India rank and total medals: भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये गुरुवारी दोन पदकांची कमाई केली आहे. नौकानयनपटू सतनाम सिंग व सलमान खान यांनी पुरुषाच्या डबल स्कल्समध्ये कांस्यपदक जिंकले, तर वुशूमध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदकाची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होऊन जवळपास आठवडा झाला आणि भारताची चाल संथ गतीने सुरू आहे. नेमबाजीत अजूनही भारताला सुवर्ण जिंकता आलेले नाही. तेच दुसरीकडे चीनने पदकांचे शतक पूर्ण करून दबदबा राखला आहे. मग भारत सध्या कोणत्या क्रमांकावर आहे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com