badminton India’s HS Prannoy Lakshya Sen knocked out in opening round
badminton India’s HS Prannoy Lakshya Sen knocked out in opening roundsakal

China Open 2023 : भारतीयांचा सुमार खेळ प्रणॉय, लक्ष्यचा पराभव

भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी मंगळवारचा दिवस निराशाजनक ठरला. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी व महिला दुहेरी या तिन्ही प्रकारात पराभव

चँगझाऊ : भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी मंगळवारचा दिवस निराशाजनक ठरला. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी व महिला दुहेरी या तिन्ही प्रकारात पराभव झाला. त्यामुळे सर्वांचेच आव्हान संपुष्टात आले. प्रणॉय, लक्ष्य सेन, प्रियांशू राजवत यांचा पुरुषांचा एकेरीत; तर एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला यांचा पुरुषांच्या दुहेरीत आणि ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचा महिला दुहेरीत पराभव झाला.

badminton India’s HS Prannoy Lakshya Sen knocked out in opening round
China Open 2023: प्रणॉय, लक्ष्यच्या खेळावर लक्ष; चायना ओपन बॅडमिंटन आजपासून

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ब्राँझपदक जिंकलेल्या प्रणॉयचा पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव झाला. मलेशियाच्या एन.जी. योंग याने प्रणॉयवर तीन गेममध्ये विजय मिळवला. मलेशियन खेळाडूने २१-१२, १३-२१, २१-१८ असे प्रणॉयवर यश मिळवले.

भारतीय खेळाडूचा एक तास व सहा मिनिटांत पराभव झाला. डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसन याने लक्ष्यची झुंज २३-२१, १६-२१, २१-९ अशी मोडून काढली. लक्ष्यचा एक तास व १८ मिनिटांमध्ये पराभव झाला. शेसार रुस्तावितो याने प्रियांशूला २१-१३, २६-२४ असे हरवले.

दुहेरीतही अपयश

भारतीय खेळाडूंना दुहेरीतही अपयशाचा सामना करावा लागला. ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीला महिला दुहेरीत चेन किंग-जिया फॅन यांच्याकडून २१-१८, २१-११ असा पराभवाचा सामना करावा लागला. केईचिरो मातसुई-योशिनोरी तकेऊची या जोडीने एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला या भारतीय जोडीला २३-२१, २१-१९ असे नमवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com