
Summary
चीनमध्ये ५०० पेक्षा जास्त रोबोट्सनी "रोबोट ऑलिम्पिक"मध्ये भाग घेतला.
धावण्याच्या शर्यतीत एक रोबोट ट्रॅकबाहेर जाऊन धडकला, व्हिडीओ व्हायरल.
फुटबॉल स्पर्धेत चीनच्या विद्यापीठांच्या रोबोट्सनी विजय मिळवला.
China Robot Olympics: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं अद्भुत विश्व चीनमध्ये बघायला मिळालं. चीनने ह्युमनॉइड रोबोट्सचं ऑलिम्पिक चार दिवस भरवलं होतं. या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १६ देशांच्या २८० टीम सहभागी झाल्या होत्या. रोबोंच्या ऑलिम्पिकमध्ये ५०० पेक्षा जास्त रोबोट होते. ही स्पर्धा पाहण्यासाठीही मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. स्पर्धेतील काही व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. रोबोट फुटबॉल खेळताना, बॉक्सिंग रिंगमध्ये एकमेकांवर अटॅक करताना आणि रेसिंग ट्रॅकवर धावताना दिसतायत.