
MS Dhoni : नि:स्वार्थी खेळाडू! गेल, कुंबळे अन् उथप्पा सर्वांनी घेतलं एकच नाव...
MS Dhoni Most Most Selfless Player : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक एमएस धोनीला अनेकजण चांगला व्यक्ती, मेंटॉर, कारकिर्द घडवणारा माही भाई, कूल कॅप्टन अशी बिरूदावली लावतात. आता महेंद्रसिंह धोनीला अजून एक मोठा टॅग लागला आहे. धोनी आता सर्वात नि:स्वार्थी खेळाडू म्हणून गणला जात आहे.
हे आम्ही म्हणत नाही तर जगभरातील विख्यात आणि अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू धोनीला नि:स्वार्थी खेळाडू म्हणत आहेत. ख्रिस गेल, अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, स्कॉट्स स्टायरिस यांच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना एका रॅपिड फायर राऊंडमध्ये टी 20 लीग इतिहासातील सर्वात निःस्वार्थी खेळाडू कोण असे विचारल्यावर या सर्वांना एकमुखाने महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले.
जिओ सिनेमावर माजी आयपीएल खेळाडूंना काही रॅपिड फायर प्रश्न विचाण्यात आले. त्यावेळी त्यांनी महेंद्रसिंह धोनीला सर्वात निःस्वार्थी खेळाडू म्हणून निवडले. तर सर्वात स्टायलिश खेळाडू म्हणून केएल राहुलची निवड केली.
महेंद्रसिंह धोनी काही महिन्यात होणाऱ्या आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसले. त्याने सरावाला देखील सुरूवात केली आहे. नुकत्याच रांची येथे झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 सामन्यात देखील धोनी भारतीय संघासोबत चर्चा करताना दिसला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने देखील धोनीशी चर्चा केली.
यावेळी हार्दिक पांड्या म्हणाला की, 'माही भाई इथं आला आहे. आम्हाला त्याला भेटून चांगले वाटले. आम्ही त्याला भेटण्यासाठी हॉटेलमधून बाहेर देखील पडलो. नाहीतर आम्ही गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे ते पाहता आम्ही नुसतं हॉटेल हॉटेलच करत आहोत.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ