Chris Gayle Martin Guptill And Others Stranded As League Turns Into Mess
Esakal
क्रीडा
७० पेक्षा जास्त क्रिकेटर अडकले हॉटेलमध्ये, फायनलआधी आयोजकच फरार; गेल, गुप्टिलसह अनेक दिग्गजांचा स्पर्धेत सहभाग
इंडियन हेवन प्रीमीयर लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असून या स्पर्धेच्या आयोजकांनीच पळ काढल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ हॉटेलमध्ये अडकून पडला आहे.
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या इंडियन हेवन प्रीमीयर लीगमध्ये धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर आठवड्याभरातच आयोजक फरार झाले आहेत. तर ७० पेक्षा जास्त खेळाडू, अंपायर आणि सपोर्ट स्टाफ अडकून पडला आहे. हॉटेलचं बिलही आयोजकांनी दिलं नसल्यानं आता खेळाडू आणि सहभागी होण्यासाठी आलेल्यांना फटका बसणार आहे. सोशल मीडियावर रिल्स, फोटो, व्हिडीओ शेअर करून आयोजकांनी वातावरण निर्मितीही केली आहे. ख्रिस गेल, मार्टिन गुप्टीलसह अनेक दिग्गजांनी या स्पर्धेत भाग घेतलाय.

