esakal | जैवसुरक्षा वातावरणात ख्रिस गेलची घुसमट । Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

जैवसुरक्षा वातावरणात ख्रिस गेलची घुसमट

जैवसुरक्षा वातावरणात ख्रिस गेलची घुसमट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुबई : पंजाब किंग्जचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून तडकाफडकी माघार घेतली आहे. आयपीएलसाठी तयार करण्यात आलेल्या जैवसुरक्षा वातावरणात घुसमट होत असल्याने माघार घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. गेल गेल्या महिन्यात कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) स्पर्धेत खेळत होता. त्या वेळीही तो जैव सुरक्षा वातावरणामध्ये होता. त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी तयार करण्यात आलेल्या जैवसुरक्षा वातावरणात त्याने थेट प्रवेश केला होता. सततच्या या वातावरणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून गेलने उर्वरित आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच

‘गेल्या काही महिन्यांपूर्वी मी आधी वेस्ट इंडीज क्रिकेटच्या जैव सुरक्षा वातावरणाचा भाग होतो. त्यानंतरच्या सीपीएलसाठीही मला जैविकरणामध्ये राहावे लागले. आणि आता पुन्हा मी आयपीएलसाठीच्या जैव सुरक्षा वातावरणात आहे. माझी घुसमट होऊ लागली असून माझ्या मानसिक स्वास्थ्यावरही त्याचा परिणाम होत असल्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत मला स्वत:ला रिफ्रेश करणे गरजेचे असल्याने मी माघार घेत आहे’, असे गेलने स्पष्ट केले आहे.

"मला सध्या मानसिक विश्रांतीची गरज आहे. वेस्ट इंडीजला आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या ताजातवाना असणे गरजेचे आहे. पंजाब किंग्ज संघाने मला ब्रेक घेण्याची परवानगी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. उर्वरित स्पर्धेसाठी पंजाब संघाला माझ्या शुभेच्छा!" ख्रिस गेल, वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू

loading image
go to top