esakal | पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच । elections
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच

sakal_logo
By
गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांनी मिळून महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच अंतिम केली आहे. या निर्णयात आता बदल होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती असेल, असे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धती असावी, अशी मागणी कधीही केली नव्हती. त्यामुळे अजित पवार हे दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत आग्रही होते, हे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: उदगीर : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघास दहा वर्ष सक्तमजुरी

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी पवार शुक्रवारी पुण्यात आले होते. या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले, ‘‘या सदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा नेमका कोणत्या राजकीय पक्षाला होणार, हे निवडणूक निकालानंतरच समजू शकेल. आताच त्याबाबत भाष्य करता येणार नाही. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत आघाडी करायची की नाही, हे स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा, असे माझे व्यक्तीगत मत आहे.’’

हेही वाचा: आमदार नवघरे यांनी ट्रँक्टरव्दारे केली नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी

सध्या राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. या महापालिकांतील भाजपची ताकद कमी करून, या पालिकांमध्ये स्वतःच्या पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष आपापल्या परीने करत आहेत. त्यामुळेच पालिकांची प्रभाग पद्धती आपल्याच सोईची कशी होईल, या सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात होते. यातूनच प्रभाग पद्धती नेमकी किती सदस्यीय असावी, याबाबत या तीनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. परिणामी याबाबत अंतिम निर्णय होत नव्हता.

निवडणूक होणार असलेल्या महापालिका

बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर.

loading image
go to top