esakal | Video: खतरनाक स्विंग.. चेंडू टप्पा पडताच अचानक आत वळला अन्... | Indian Women Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

Shikha-Pandey-Swing-Bowled

फलंदाजी करणाऱ्या हेलीला काही कळण्याआधीच स्टंप उडाला

Video: खतरनाक स्विंग.. चेंडू टप्पा पडताच अचानक आत वळला अन्..

sakal_logo
By
विराज भागवत

INDW vs AUSW: भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात पराभव झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ११८ धावा केल्या होत्या. पूजा वस्त्रकार (३७*), कर्णधार हरमनप्रीत कौर (२८) आणि दीप्ती शर्मा (१६) वगळता इतर कोणीही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठून शकले नाही. ११९ धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियन महिला संघाने ५ चेंडू आणि ४ गडी राखून पूर्ण केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर एक खतरनाक स्विंग पाहायला मिळाला.

हेही वाचा: IPL 2021: शेवटच्या चेंडूवर षटकार; RCB चा दिल्लीवर थरारक विजय

भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिने गोलंदाजीच्या डावाला सुरूवात केली. अलिसा हेली हिने तिच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत डावाची दमदार सुरूवात केली. पण पुढच्याच चेंडूवर अलिसा क्लीन बोल्ड झाली. शिखा पांडेने टाकलेला चेंडू अंदाजे सहाव्या स्टंपच्या रेषेत होते. तेथून टप्पा पडून चेंडू अचानक इन स्विंग झाला. चेंडू नक्की कसा येतोय हे कळेपर्यंत अलिसा त्रिफळाचीत झाली होती.

पाहा व्हिडीओ-

हेही वाचा: IND vs AUS: 'क्रिकेटच्या देवा'ने केलं स्मृती मंधानाचं कौतुक!

दरम्यान, भारताकडून पूजा वस्त्रकारच्या नाबाद ३७ धावांच्या खेळीमुळे संघाने कशीबशी शंभरीपार मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना बेथ मूनीने ३४ धावांची खेळी केली. ताहिला मॅकग्रा हिने मात्र एक बाजू लावून धरली. तिने नाबाद ४२ धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिच्या या खेळीसाठी तिला सामनावीराचा किताब देण्यात आला.

loading image
go to top