esakal | IND vs AUS: 'क्रिकेटच्या देवा'ने केलं स्मृती मंधानाचं कौतुक! | Smriti Mandhana
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS: 'क्रिकेटच्या देवा'ने केलं स्मृती मंधानाचं कौतुक!

स्मृतीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ठोकलं धडाकेबाज शतक

IND vs AUS: 'क्रिकेटच्या देवा'ने केलं स्मृती मंधानाचं कौतुक!

sakal_logo
By
विराज भागवत

INDW vs AUSW Pink Ball Test: भारतीय महिला संघ आपला पहिलावहिला दिवस रात्र पद्धतीचा कसोटी सामना खेळत आहे. गुलाबी चेंडूच्या या सामन्यात भारताने पहिल्या दोन दिवसांवर आपले वर्चस्व राखले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबण्याआधी ५ बाद २७६ धावांपर्यंत मजल मारली. यात मोलाचा वाटा उचलला सलामीवीर स्मृती मंधानाने. तिने दमदार शतक ठोकत आपली पात्रता सिद्ध केली. क्रिकेटचा देव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने स्मृतीचे तोंडभरून कौतुक केले.

हेही वाचा: "आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार

स्मृती मंधानाच्या बॅटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकत प्रथम भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघींनी २५ षटके खेळत ९३ धावांची सलामी दिली. शफाली ६४ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला. स्मृती मंधानाने मात्र दमदार फलंदाजी करत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक झळकावले. गुलाबी चेंडूने दिवस रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला ठरली. तिच्या खेळीचे खुद्द सचिनने कौतुक केले.

हेही वाचा: Video: अजब गजब क्लीन बोल्ड... मोईन अलीची विकेट एकदा पाहाच

हेही वाचा: स्मृती मानधनाचं धडाकेबाज शतक! ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

दरम्यान, स्मृतीने आपल्या खेळीत २२ चौकार आणि एका षटकारासह १२७ धावा केल्या. स्मृती बाद झाल्यावर पूनम राऊत (३६), मिताली राज (३०) आणि यास्तिका भाटिया (१९) या तीन फलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळे भारताने २७६ धावांपर्यंत पोहोचताना ५ गडी गमावले.

loading image
go to top