शाब्बास एबी! तुझ्यासारखा विचार कुणी केला नसता

दक्षिण आफ्रिका बोर्डाने त्याच्या चाहत्यांचा हिरमोड करणारी बातमी दिली.
AB de Villiers
AB de Villierse sakal

आयपीएलमधील (IPL 2021) दमदार कामगिरीनंतर एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये तो खेळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. मात्र दक्षिण आफ्रिका बोर्डाने त्याच्या चाहत्यांचा हिरमोड करणारी बातमी दिली. एबी डिव्हिलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार नाही, असे बोर्डाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. एबीने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना जसाआश्चर्याचा धक्का बसला अगदी तसाच धक्का या वृत्तानंतरही बसला असेल. एबीचा निर्णय हा कळण्यापलिकडचा असला तरी त्यामागचे गुपित कळल्यानंतर त्याच्या फॅन्सला त्याचा अभिमान निश्चितच वाटेल.

AB de Villiers
कोहलीची श्रवणथीच्या आईवरील उपचारासाठी लाख मोलाची मदत

दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी एबीने स्वत: न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही तर त्यांनी यामागचे कारणही सांगितले आहे. आपल्यामुळे सध्याच्या घडीला संघात असलेल्या खेळाडूला बाहेर जाण्याची वेळ येऊ नये, हा विचार करुन एबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक न करण्याचा निर्णय घेतलाय.

AB de Villiers
भान विसरला; लॉनमध्ये लस घेतल्याने कुलदीप अडचणीत

‘द सिटीझन' वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोच आणि एबीसोबत खेळलेलेल बाउचर म्हणाले की, ‘‘एबी डिव्हिलियर्सने काही स्वत:ची कारणे आहेत ज्यामुळे तो पुन्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार नाही. त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो. त्याच्यामध्ये संघात ऊर्जा निर्माण करण्याची ताकद आहे. त्यामुळेच तो संघात असावा असे वाटत होते. त्याने इतर खेळाडूंचा विचार करुन घेतलेला निर्णयाचा सन्मान करायला हवा, असे बाउचर यांनी म्हटले आहे.

2018 मध्ये एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये सक्रीय राहिला. आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून त्याने धमाकेदार कामगिरीही केली. अजूनही दमदार फटकेबाजी करण्याची ताकद असल्याचे त्याने स्पर्धेत दाखवून दिले होते. डिव्हिलियर्सने 114 टेस्ट, 228 वनडे आणि 78 टी 20 सामने खेळले आहेत. यात 47 शतकांचा समावेश आहे. आयपीएल 2021 मध्ये डिव्हिलियर्सने 6 डावात 51.75 च्या सरासरीने 207 धावा केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com