Funny Hit Wicket Video | Viral Video: अरे देवा! अजब गजब पद्धतीने घालवली स्वत:ची विकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Comedy-Hit-Wicket-SL-vs-WI

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

Video: अरे देवा! अजब गजब पद्धतीने घालवली स्वत:ची विकेट

SL vs WI, 1st Test : श्रीलंकेचा संघ सध्या विंडिजविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेने वर्चस्व गाजवले. दमदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या डावात ३८६ धावा केल्या. कर्णधार दिमुथ करूणरत्ने याचा यात मोठा वाटा होता. त्याने १४७ धावांची खेळी केली. प्रथुम निसंका (५६) आणि धनंजय डि सिल्वा (६१) यांनीही अर्धशतकी खेळी केल्या. धनंजय डि सिल्वाची विकेट साऱ्यांनाच हसवून गेली.

हेही वाचा: IND vs NZ: "डोक्यात लगेच हवा जाऊ देऊ नका"; द्रविडची ताकीद

श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज धनंजय डी सिल्वा दुसऱ्या दिवसाच्या खेळात मैदानावर होता. त्याने दिमाखदार अर्धशतक ठोकलं. तो पुढे खेळत असताना विचित्र पद्धतीने त्याची विकेट गेली. डावाच्या ९५व्या षटकात शॅनन गॅब्रियल गोलंदाजी करायला आला. त्याचा एक चेंडू डी सिल्वाने बचावात्मक पद्धतीने खेळला, पण चेंडू बॅटला लागून स्टंपच्या दिशेला गेला. चेंडूला स्टंपला लागणार इतक्यात त्याने चेंडू बाजूला केला पण त्या प्रयत्नात त्याची बॅटच स्टंपला लागली आणि तो हिट विकेट झाला.

हेही वाचा: IND vs NZ: धडाकेबाज मालिका विजयानंतरही रोहित नाराज, कारण...

दरम्यान, श्रीलंकेच्या संघाने धडाकेबाज ३८६ धावा केल्यानंतर विंडिजच्या संघाला मात्र चांगली सुरूवात मिळाली नाही. शंभरीच्या आतच विंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला होता.

loading image
go to top