esakal | Video: पूनम राऊतने फटका खेळताच झालं जोरदार अपील अन् पुढे... | INDW vs AUSW
sakal

बोलून बातमी शोधा

Video: पूनम राऊतने फटका खेळताच झालं जोरदार अपील अन् पुढे...

पूनमने केलेल्या कृतीचा प्रत्येक भारतीयाला नक्कीच वाटेल अभिमान

Video: पूनम राऊतने फटका खेळताच झालं जोरदार अपील अन् पुढे...

sakal_logo
By
विराज भागवत

INDW vs AUSW Pink Ball Test: भारतीय महिला संघाने आपल्या पहिल्यावहिल्या दिवस रात्र पद्धतीच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २७६ धावांपर्यंत मजल मारली. गुलाबी चेंडूने भारतीय महिला संध पहिल्यांदाच खेळत असल्याने साऱ्यांचे या सामन्याकडे लक्ष होते. भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने अप्रतिम खेळ करत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. मात्र त्याहून जास्त चर्चा झाली ती भारताच्या पूनम राऊत हिच्या खिलाडूवृत्तीची...

हेही वाचा: स्मृती मानधनाचं धडाकेबाज शतक! ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

क्रिकेट हा Gentleman's Game मानला जातो. पण गेल्या काही वर्षात या खेळाला अनेकदा गालबोट लावणारे प्रसंग घडले. दोन खेळाडूंमधील टोकाचे वाद असोत किंवा चेंडू कुरतडण्याचा (Ball Tampering) प्रकार असो, साऱ्या घटनांमध्ये क्रिकेटची बदनामी झाली आहे. पण आज पूनम राऊतने जे केले त्या वर्तनाला तोड नव्हती. खिलाडूवृत्तीचे आणि प्रामाणिकपणाचे एक उदाहरणच तिने सर्वांसमोर उभे केले.

हेही वाचा: Video: अजब गजब क्लीन बोल्ड... मोईन अलीची विकेट एकदा पाहाच

नक्की काय घडलं पाहा...

पूनम ३६ धावांवर खेळत होती. त्यावेळी मोलीनक्स ही खेळाडू फिरकी गोलंदाजी करत होती. चेंडूचा टप्पा पडल्यावर तो स्पिन झाला. पूनमच्या बॅटच्या जवळून चेंडू पास झाला आणि विकेटकिपरने झेल टिपला. चेंडूचा झेल घेतल्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या सर्वच खेळाडूंनी जोरदार अपील केले. पंचांनी पूनम राऊतला बाद दिलेले नव्हते, पण प्रामाणिकपणा दाखवत पूनम स्वत:च मैदान सोडून पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागली. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

loading image
go to top