esakal | Video: अजब गजब क्लीन बोल्ड... मोईन अलीची विकेट एकदा पाहाच | Moeen Ali
sakal

बोलून बातमी शोधा

Moeen-Ali-Wicket

चेंडू अचानक आला, स्टंपला लागला, लाईट्सही पेटले अन्...

Video: अजब गजब क्लीन बोल्ड... मोईन अलीची विकेट एकदा पाहाच

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 CSK vs SRH: चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे हैदराबादने २० षटकात केवळ १३४ धावांपर्यंतच मजल मारली. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर चेन्नईकडून जोश हेजलवूडने २४ धावांत ३ बळी टिपले. १३५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मोईन अलीची विकेट चर्चेत राहिली.

हेही वाचा: Video: धोनी स्टाईलमध्ये विषय END! पाहा MS चा विजयी सिक्सर...

१३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४१) यांनी शतकी सलामी दिली. ऋतुराज गायकवाड जलदगतीने फटकेबाजी करत असताना बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोईन अलीकडून संघाला अपेक्षा होत्या. पण १७ धावांव असताना त्याच्यासोबत एक विचित्र प्रसंग घडला. राशिद खानने टाकलेला चेंडू मोईन अलीच्या दोन पायांच्या मधून गेला. त्याला पुढे काही कळेपर्यंत चेंडूने स्टंपचा वेध घेतला आणि तो विचित्र प्रकारे त्रिफळाचीत झाला.

हेही वाचा: Video: ब्राव्होचा खतरनाक यॉर्कर अन् विल्यमसनचा उडाला गोंधळ

पाहा विचित्र क्लीन बोल्ड-

हेही वाचा: IPL 2021: माही भाई लाजवाब! 'कॅप्टन कूल' धोनीचं अनोखं शतक

मोईन अली बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात अनुभवी सुरेश रैना २ धावा काढून माघारी परतला. त्याला फटकेबाजी करणं शक्य झालं नाही. त्याच षटकात सेट फलंदाज फाफ डू प्लेसिस एका चेंडूच्या अंतराने झेलबाद झाला. या दोघांच्या विकेटनंतर सामना रंगतदार अवस्थेत आला होता. पण शेवटच्या तीन षटकांमध्ये योग्य वेळी फटकेबाजी करून चेन्नईने विजय मिळवला.

loading image
go to top