मेरी कोम अंतिम फेरीत; सरिता, पिंकीचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - मेरी कोम राष्ट्रकुल क्रीडा बॉक्‍सिंगच्या अंतिम फेरीत प्रवेश करीत असतानाच पिंकी राणी आणि सरिता देवी यांना उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली. विकास क्रिशन, गौरव सोळंकी आणि मनीष कौशिकने उपांत्य फेरीत प्रवेश करीत पदक निश्‍चित केले. आशियाई विजेत्या मेरीने ४८ किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. पाच वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरीने श्रीलंकेच्या अनुष्का दिलरुखशी हिचा ५-० असा सहज पाडाव केला. आता मेरीला पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपदकाचे वेध लागले आहेत. पिंकी राणी तसेच सरिताने घोर निराशा केली. पिंकीला लिसा व्हाइटसाइडविरुद्ध हार पत्करावी लागली.

गोल्ड कोस्ट - मेरी कोम राष्ट्रकुल क्रीडा बॉक्‍सिंगच्या अंतिम फेरीत प्रवेश करीत असतानाच पिंकी राणी आणि सरिता देवी यांना उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली. विकास क्रिशन, गौरव सोळंकी आणि मनीष कौशिकने उपांत्य फेरीत प्रवेश करीत पदक निश्‍चित केले. आशियाई विजेत्या मेरीने ४८ किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. पाच वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरीने श्रीलंकेच्या अनुष्का दिलरुखशी हिचा ५-० असा सहज पाडाव केला. आता मेरीला पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपदकाचे वेध लागले आहेत. पिंकी राणी तसेच सरिताने घोर निराशा केली. पिंकीला लिसा व्हाइटसाइडविरुद्ध हार पत्करावी लागली. लढतीच्यावेळी समालोचक सातत्याने भारतीय सरस असल्याचे सांगत होते, पण तिला हार पत्करावी लागली. त्यापूर्वी सरिता देवी ऑस्ट्रेलियाच्या ॲजा स्त्राईदस्‌मन हिच्याविरुद्ध पराजित झाली होती. ती या स्पर्धेत हार पत्करलेली पहिली भारतीय बॉक्‍सर ठरली होती.

Web Title: common wealth games mary kom in final