डायमंड लीग स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राचा राष्ट्रीय विक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

नागपूर - गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राने दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला असला तरी तो ब्राँझपदकाच्याही जवळ पोहोचू शकला नाही. तीनही पदके जर्मनीच्या थॉमस, रोहलर (९१.७८ मी.), जोहान्स वेटटर, आंद्रेस हॉफमन यांनी पटकावली. जर्मनीचे माजी विश्‍वविक्रमवीर उव हॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या २० वर्षीय नीरजने खलिफा स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत ८७.४३ मीटर अंतरावर भाला भिरकावला आणि २०१६ मध्ये विश्‍व ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना केलेला ८६.४८ मीटरचा विक्रम मोडीत काढला. 

Web Title: common wealth games neeraj chopra