पॅरा पॉवरलिफ्टर सचिनला ब्राँझ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पॅरा पॉवरलिफ्टर सचिन चौधरी याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या हेवीवेट गटात ब्राँझ मिळविले. पॅरा स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक आहे. दहा स्पर्धकांच्या अंतिम फेरीत त्याने एकूण १८१ किलो वजन उचलले. तो ३५ वर्षांचा असून गेल्या वर्षी दुबईतील स्पर्धेत त्याने रौप्य मिळविले होते. तेव्हा त्याने एकूण २०० किलोपर्यंत मजल मारली होती. २०१२च्या पॅरालिंपिकमध्ये त्याने ८२.५० किलो वजनी गटात नववा क्रमांक मिळविला होता.

इतर तीन स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली, पण त्यांना पदक मिळविता आले नाही. लाईटवेट गटात फरमान बाशाने पाचवे, तर अशोक कुमारने ११वे, महिलांमध्ये साकिना खातूनने पाचवे स्थान मिळविले.

पुण्याची वैष्णवी सहावी
पुण्याची पॅरा जलतरणपटू वैष्णवी जगताप हिने एस ७ प्रकारातील ५० मीटर फ्री स्टाईल शर्यतीत अंतिम फेरी गाठली; पण सात स्पर्धकांत ती सहावी आली. तिची वेळ ४२.०३ सेकंद होती. प्राथमिक फेरीतही सात जणींत ती सातवी होती. त्या वेळी तिची वेळ ४१.६३ सेकंद होती. ऑस्ट्रेलियाच्या लॅकैशा पॅटरसन हिने (३०.१४) सुवर्ण मिळविले.

राष्ट्रकुलात भारत
    भारताचे सहा बॉक्‍सर उपांत्य फेरीत. मेरी कोम, अमित फानगळ, नमन तन्वर, महंमद हुसस्सामुद्दीन, मनोज कुमार यांच्यापाठोपाठ सतीश कुमारही उपांत्य फेरीत
    दीपिका पाल्लिकल-सौरव घोषालने स्क्वाशच्या मिश्र दुहेरीत पाकिस्तानच्या जोडीस हरवले, दीपिका-जोश्ना चिनप्पाची महिला दुहेरीत आगेकूच
    लॉन बॉल्सच्या महिला तिहेरीत भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 
हार, तर महिला दुहेरीत जर्सीविरुद्ध विजय
    मैत्रेयी सरकारची टेबल टेनिसमध्ये हार.
    महिलांच्या ५० मीटर फ्री स्टाइलमध्ये वैष्णवी जगताप (४१.६२) 
अंतिम फेरीत

Web Title: common wealth games para power lifting sachin chaudhary bronze medal