नेमबाजीत जितु रायचा सुवर्णवेध; मिथरवालला ब्राँझ

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

भारतीय नेमबाज महिलांनी रविवारी दोन पटके पटकाविल्यानंतर आज (सोमवार) पुरुष नेमबाजांनीही पदके मिळविली. जागतिक स्पर्धेत जितु रायला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, राष्ट्रकुलमध्ये त्याने 235.1 गुण मिळवीत अव्वल स्थान मिळविले.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकाची लयलूट कायम असून, नेमबाज जितू रायने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तर, प्रकाश मिथरवालने ब्राँझपदक मिळविले.

भारतीय नेमबाज महिलांनी रविवारी दोन पटके पटकाविल्यानंतर आज (सोमवार) पुरुष नेमबाजांनीही पदके मिळविली. जागतिक स्पर्धेत जितु रायला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, राष्ट्रकुलमध्ये त्याने 235.1 गुण मिळवीत अव्वल स्थान मिळविले. मिथरवालने 214.3 गुण मिळवीत ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या केरी बेल याने 233.5 गुणांसह रौप्यपदक मिळविले.

भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत 8 सुवर्णपदके मिळविली आहेत. तर, 4 रौप्य आणि 5 ब्राँझ अशी 17 पदके मिळविली आहेत. पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया 89 पदकांसह पहिल्या इंग्लंड 55 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: Commonwealth Games 2018 Jitu Rai wins gold Om Mitharval bags bronze in shooting