शिवलिंगमने भारताला मिळवून दिले तिसरे सुवर्ण

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत मिळविलेली तिन्ही सुवर्णपदके ही वेटलिफ्टिंगमध्येच मिळविली आहेत. शिवलिंगमने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी सतीशकुमार शिवलिंगम या वेटलिफ्टरने करून दाखविली. भारताला आतापर्यंत या स्पर्धेत पाच पदके मिळाली आहेत.

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत मिळविलेली तिन्ही सुवर्णपदके ही वेटलिफ्टिंगमध्येच मिळविली आहेत. शिवलिंगमने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. त्यापूर्वी मिराबाई चानू आणि संचीता चानू यांनी सुवर्णपदके मिळविली होती. तर, एक रौप्य आणि ब्राँझपदकही वेटलिफ्टिंगमध्येच मिळालेले आहे.

शिवलिंगमने स्नॅच प्रकारात पहिल्या प्रय़त्नात 136, दुसऱ्या 140 आणि तिसऱ्या प्रयतन्ता 144 वजन उचलले. मात्र, इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरने 145 किलो उचलून त्याला मागे टाकले. मात्र, क्लिन अँड जर्कमध्ये शिवलिंगमने त्याला मागे टाकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ऑलिव्हरला रौप्य आणि ऑस्ट्रेलियाच्या फ्रान्सिस इताउंदीला ब्राँझपदक मिळाले.

Web Title: Commonwealth Games 2018 Weightlifter Sathish Sivalingam wins gold medal