Commonwealth Games 2022: भारताची पदकतालिकेत घसरण; सहाव्या दिवशी पाच पदक जिंकूनही ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commonwealth Games 2022 Medal Tally 2022

Commonwealth Games 2022: भारताची पदकतालिकेत घसरण; सहाव्या दिवशी पाच पदक जिंकूनही ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी

Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्घिंगहम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदक जिंकली आहेत. बर्मिंगहम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत 158 सुवर्णपदके निश्चित झाली आहेत. यातील सर्वात जास्त पदक मात्र ऑस्ट्रेलियानं आपल्या नावी केली आहेत. त्याबरोबरच ब्रिटननं १०३ पदकांवर कब्जा केला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत सहाव्या दिवशी तब्बल पाच पदक जिंकूनही भारताची पदकतालिकेत एका स्थानानं घसरण झालीय. (Commonwealth Games 2022 Medal Tally 2022)

हेही वाचा: CWG 2022 Schedule Day 7: ऍथलीट ते बॉक्सिंग रिंग..७ व्या दिवशीही भारतीय खेळाडूंचा जलवा

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 38 सुवर्णपदकासह एकूण 123 पदकं जिंकली आहेत. तर 38 सुवर्णपदकासह एकूण 103 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत कॅनाडा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाच्या खात्यात आतापर्यंत 16 सुवर्णपदकासह एकूण 57 पदकं आहेत.

याशिवाय, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड (16 सुवर्ण, एकूण 36 पदक), पाचव्या क्रमांकावर स्कॉटलंड (7 सुवर्ण, एकूण 32 पदक), सहाव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (6 सुवर्ण पदक, एकूण 20 पदक), सातव्या क्रमांकावर भारत (5 सुवर्ण, एकूण 18 पदक), आठव्या क्रमांकावर वेल्स (4 सुवर्ण, एकूण 17 पदक), नवव्या क्रमांकावर मलेशिया(3 सुवर्ण, एकूण 8 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर नायजेरिया (3 सुवर्ण, एकूण 8 पदक).

Web Title: Commonwealth Games 2022 Country Wise Tally See Country Wise Medal List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportsmedals
go to top