गोल्ड मेडलसाठी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला घातले धोक्यात?

INDvsAUS
INDvsAUS esakal

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताच्या मध्य फळीने केलेल्या हाराकरीमुळे भारतीय संघाला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. शेवटच्या ३५ धावात ८ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाने अचानक अखेर क्षणी बाजी पलटवत सुवर्णपदकावर कब्जा केला. मात्र, सुवर्ण कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ वादात सापडण्याची शक्यता आहे.

रविवारी खेळवण्यात आलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ताहिला मॅकग्रा चक्क कोरोनाबाधीत असतानाही या सामन्यात सामील झाली होती. त्यामुळे इतर खेळाडूंच्या आरोग्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला तोच संघ कायम ठेवला. कोविडचे संकट अद्याप पूर्णपणे टळले नाही. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंची कोविड चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये ताहिलाला कोविडची काही सौम्य लक्षणे दिसून ‌आली होती. अशा परिस्थितीतही तिला या अति महत्त्वाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली.

ती इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह ड्रेसिंग रूम शेअर करताना दिसली नाही. ऑस्ट्रेलियाचे दोन बॅटर बाद झाल्यानंतर ती फलंदाजीला देखील आली. मात्र, ४ चेंडूवर अवघ्या २ धावा केल्या असताना, तीला दिप्ती शर्माने बाद केले. मात्र, तिला अशा पद्धतीने खेळण्यासाठी परवानगी देणे धोकादायक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com