वयाच्या पाचव्या वर्षी गोल्डन बॉय सुधीर ठरला होता पोलिओचा बळी, जाणून घ्या Inside Story

पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला. त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकून मोठी कामगिरी केली.
gold medalist para powerlifter Sudhir story
gold medalist para powerlifter Sudhir storyesakal
Updated on

पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला. त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकून मोठी कामगिरी केली. सुधीरने 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. ऐतिहासिक कामगिरीनंतर सुधीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, इथपर्यंतचा त्याचा प्रवास खडतर आहे. ऐन उमिदेच्या काळात त्याला पोलिओसारख्या आजाराला सामोरं जावं लागलं.(Commonwealth Games 2022 gold medalist para powerlifter Sudhir story)

सुधीर सात वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता ठरला आहे. सुधीरने दोनदा स्ट्रॉंगमॅन ऑफ इंडियाचा किताबही पटकावला आहे. हरियाणातील सोनीपत येथील लाठ गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला सुधीर लहानपणापासूनच हुशार होता. वयाच्या पाचव्या वर्षी पायाच्या त्रासामुळे तो अपंग झाला. सुधीर पोलिओचा बळी ठरला. असे असूनही त्याने हार मानली नाही. 2013 मध्ये त्याने शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पॉवरलिफ्टिंग सुरू केली. त्यात सततच्या सरावामुळे हा खेळ त्याच्या जीवनाचा भाग बनला.

gold medalist para powerlifter Sudhir story
CWG2022 :लांब उडीत भारताच्या मुरली शंकरने रचला इतिहास, जिंकले रौप्यपदक

पॅरा खेळाडू वीरेंद्र धनखड याच्याकडून प्रेरित होऊन सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग सुरू केले. अवघ्या दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने तो राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आणि राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकून राज्याच्या शिरपेचार मानाचा तुरा रोवला. येथूनच सुधीरच्या मनात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली. सुधीर गेल्या सात वर्षांपासून पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत आहे.

सुधीरने २०२१ आणि २०२२ मध्ये स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया हा किताब पटकावला. यानंतर त्याने बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्यासाठी तो दिल्लीत तयारी करत होता. रोज पाच तास तो सराव करत. सकाळी तीन तास आणि सायंकाळी दोन तास यशाला गवसणी घालण्यासाठी सुधीर रोज २५० किले वजन उचलत मेहनत घेत असत.

gold medalist para powerlifter Sudhir story
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताची 'गोल्ड'न कामगिरी; सुधीरने रचला इतिहास

नेहमीच स्वदेशी खाद्यपदार्थांना प्राधान्य दिल्याचे सुधीरने सांगितले. आजही तो रोज पाच लिटर दूधासोबत हरभरा आणि बदाम खातो. यामुळे त्याचे शरीर पूर्णपणे नैसर्गिक राहते. तो इतर खेळाडूंनाही स्टिरॉइड्स न वापरण्याचा सल्ला देतो. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी तो आधीच तयारी करत आहे. यासोबतच सुधीरने पुढील वर्षी होणाऱ्या हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्ससाठीही पात्रता मिळवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com