पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताची 'गोल्ड'न कामगिरी; सुधीरने रचला इतिहास

पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला.
CWG 2022
CWG 2022esakal

पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला. त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकून मोठी कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण 6 सुवर्णपदके झाली आहेत. सुधीरने 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे.(CWG 2022 Sudhir won Gold Medal in Para powerlifting)

CWG 2022
CWG 2022 : भारताच्या कुस्ती मोहिमेला आजपासून सुरुवात

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सुधीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 134.5 च्या विक्रमी स्कोअरसह 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. सुधीरला मात्र शेवटच्या प्रयत्नात 217 किलो वजन उचलण्यात अपयश आले.

CWG 2022
Mirabai Chanu : पाकिस्तानचा सुवर्ण जिंकणारा वेटलिफ्टर मीराबाईचा जबरा फॅन

नायजेरियाच्या इकेचुकवू क्रिस्टियन उबिचुकवू याने 133.6 गुणांसह रौप्यपदक तर स्कॉटलंडच्या मिकी युलने 130.9 गुणांसह कांस्यपदक जिंकले. ख्रिश्चनने 197 किलो तर युलने 192 किलो वजन उचलले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com