CWG 2022 : ऑलिम्पिक पदक विजेत्या भाविना पटेलने राष्ट्रकुलमध्येही केले पदक निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commonwealth Games 2022 Para Table Tennis Player Bhavina Patel Enter Final Confirm Medal

CWG 2022 : ऑलिम्पिक गाजवणाऱ्या भाविना पटेलने राष्ट्रकुलमध्येही केले पदक निश्चित

Commonwealth Games 2022 : भारतीय पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेलने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी अजून एक पदक निश्चित केले. भाविना पटेलने टॉकियो पॅरालिम्पिकमध्ये देखील भारताला रौप्य पदक जिंकून दिले होते. भाविनाने बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंडच्या सू बेलीचा सेमी फायनलमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. तिने बेलीचा 3 - 0 असा सहज पराभव केला. तिने 11-6, 11-6, 11-6 असा तीन गेम्समध्ये पराभव केला. (Commonwealth Games 2022 Para Table Tennis Player Bhavina Patel Enter Final Confirm Medal)

हेही वाचा: KL Rahul : राहुलची खरंच गरज आहे का? माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान

भाविना पटेलने फुजीच्या आकानिसी लातूचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. तिने लातूचा 11-1, 11-5, 11-1 असा पराभव केला होता. दुसरीकडे राज अरविंदन आणि सोनलबेन पटेल यांना सेमी फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला.

हेही वाचा: Commonwealth Games 2022 : सुरक्षेत मोठी चूक; कुस्तीचे सामने मधेच थांबवले

राजचा नास्लरू सुलेने 1 - 3 असा पराभव केला. त्याने 11-7, 8-11, 4-11, 7-11 असा चार गेममध्ये राजचा पराभव केला. तर सोनलबेनने सेमी फायनलमध्ये पहिला गेम 11-8 असा जिंकत चांगली सुरूवात केली होती. मात्र नंतर तिने पुढचे तीनही गेम 6-11, 4-11, 7-11 असे गमावले त्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.

Web Title: Commonwealth Games 2022 Para Table Tennis Player Bhavina Patel Enter Final Confirm Medal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Table Tennis