Commonwealth Games 2022 : सुरक्षेत मोठी चूक; कुस्तीचे सामने मधेच थांबवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commonwealth Games 2022 Wrestling Matches Stopped Due To Security Reason Stadium Vacant

Commonwealth Games 2022 : सुरक्षेत मोठी चूक; कुस्तीचे सामने मधेच थांबवले

CWG 2022: बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) सुरक्षेसंदर्भात मोठी चूक (Security Issue) झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुस्तीचे सामने (Wrestling Matches) थांबवण्यात आले आहेत. संपूर्ण मैदान देखील रिकामे करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कुस्तीचे सामने उशिरा सुरू होणार आहेत. कुस्तीच्या पहिल्या फेरीत भारताच्या बजरंग पुनिया आणि दिपक पुनिया यांनी आपले पहिले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

हेही वाचा: WI vs IND : भारत पहिल्यांदाच अमेरिकेत खेळणार मात्र रोहितचं काय होणार?

यासंदर्भात युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ट्विट केले आहे की, 'आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव सामने काही काळ स्थगित केले आहेत. ज्यावेळी सामने घेण्याची परवानगी मिळेल त्यावेळी ते पुन्हा सुरू करण्यात येतील.' मिळालेल्या माहितीनुसार आता कुस्तीचे सामने भारतीय वेळानुसार सायंकाळी 5.15 ला सुरू होतील.

दीपक पुनियाच्या सामन्यानंतर लगेचच ज्या स्पिकरवरून घोषणा करण्यात येता होत्या तो स्पिकर छतावरून खाली पडला. हा स्पिकर मॅट चेअरमनच्या अगदी जवळ पडला. त्यामुळे सामने थांबवले आणि सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण स्टेडियम देखील रिकामे करण्यात आले.

हेही वाचा: CWG 2022 Day 8 Live : दीपक अन् बजरंग पुनियाची विजयी सुरूवात

दरम्यान, भारताने कुस्तीच्या आखाड्याच विजयी सुरूवात केली. बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी आपले पहिले सामने जिंकले. बजरंगने नॉरूच्या लॉवे बिंघमचा 4- 0 तर दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूचा 10 - 0 असा पराभव करत पुढची फेरी गाठली.

Web Title: Commonwealth Games 2022 Wrestling Matches Stopped Due To Security Reason Stadium Vacant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :wrestlingSecurity