Bindyarani Devi Clinches Bronze in Women's 58kg Weightlifting
Bindyarani Devi wins bronze Commonwealth Games 2026: शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बिंद्यारानी देवी सोरोखैबाम ( Bindyarani Devi Sorokhaibam) हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला वेटलिफ्टिंग प्रकारात आणखी एक पदक पटकावून दिले. हे भारताचे एकूण सहावे पदक ठरले आणि यापैकी पाच पदकं ही वेटलिफ्टिंगमध्येच सलेली आहेत. त्यात मीराबाई चानूच्या एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. महिलांच्या ५८ किलो वजनी गटात इंफाळ, मणिपूर येथील लेकीने भारताचा तिरंगा डौलाने फडकवला. त्याआधी ज्ञानेश्वरी यादवने ( Gyaneshwari Yadav) ५३ किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग रौप्यपदक जिंकले.