COMMONWEALTH GAMES

राष्ट्रकुल स्पर्धेचा थरार... दर ४ वर्षांनी खेळवली जाणारी ही स्पर्धा ऑलिम्पिकनंतरची ही जगातील दुसरी सर्वात मोठी मल्टिनॅशनल स्पर्धा आहे, ज्यात राष्ट्राकुल संघटनेचे सदस्य असलेले देश भाग घेतात... यातील बहुतांश देश हे भूतकाळात ब्रिटिश साम्राज्याचे भाग किंवा वसाहती राहिलेले देश असून ज्यात भारताचाही समावेश आहे... त्यामुळेच ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये एकमेकांशी सलोखा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शांतता टिकवून ठेवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याने त्याला फेंड्रली गेम्स असंही म्हटलं जातं... १९३० मध्ये कॅनडातल हॅमिल्टन येथे ही स्पर्धा पहिल्यांदा झाली.. सुरुवातीला ब्रिटिश एम्पायर गेम्स असं नाव होतं... पण नंतर १९७८ मध्ये या स्पर्धेचं नाव अधिकृतपणे कॉमनवेल्थ गेम्स करण्यात आलं...| COMMONWEALTH GAMES
Marathi News Esakal
www.esakal.com