Gyaneshwari Yadav wins silver Commonwealth Games 2026
esakal
Commonwealth Games 2026 weightlifting India medals: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. भारताने या स्पर्धेत १ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली आहे. सोमवारी ज्ञानेश्वरी यादवने ( Gyaneshwari Yadav) स्पर्धा विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. तिने महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग विभागात ही कामगिरी केली. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत आलेली ज्ञानेश्वरी पदक निश्चित होताच खुर्चीवर ठेवलेल्या तिरंग्यासमोर नतमस्तक झाली.