Commonwealth Games 2026 Gymnast
esakal
ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ दरम्यान पुरुषांच्या सांघिक जिम्नॅस्टिक्स अंतिम फेरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इंग्लंडचा अवघा १९ वर्षीय जिम्नास्ट गेब्रियल लँगटन हाय बारवरील आपला रूटीन सादर करत असताना अचानक त्याचा हात निसटला आणि तो थेट डोक्याच्या बाजूने जमिनीवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की काही क्षण संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.