Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

Lovlina Borgohain wins silver Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या बॉक्सिंगमधील सुवर्णमोहिमेला अखेर ब्रेक लागला. ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहैन हिला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-स्यू ग्रीनट्री हिच्याकडून ४-१ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे लव्हलिनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Lovlina Borgohain Commonwealth Games 2026 final result

Lovlina Borgohain Commonwealth Games 2026 final result

Updated on

Lovlina Borgohain Commonwealth Games 2026 final result : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ खऱ्या अर्थाने भारतासाठी कुणी गाजवली असेल तर बॉक्सिंगपटूंनी... मेरी कोमचा वसा घेऊन रिंगमध्ये उतरलेल्या भारतीय बॉक्सर्सनी राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर भारताने पदक तालिकेत दहाव्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारताचे दहाच्या दहा बॉक्सर्स फायनलमध्ये पोहोचले आणि त्यात साक्षी, प्रीती, जैस्मिन, प्रिया आणि अरुंद्धती यांनी सुवर्ण कामगिरी केली. जादूमणी सिंगला रौप्यपदक मिळाले. पण, भारताच्या या सुवर्ण दौडला ब्रेक लागला... लव्हलिना बोरगोहैनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com