Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

India medal tally Commonwealth Games 2026 latest: भारतीय बॉक्सिंगपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. अवघ्या ३० मिनिटांत तीन सुवर्णपदके जिंकत भारताने राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
Arundhati Choudhary wins gold Commonwealth Games 2026

Arundhati Choudhary wins gold Commonwealth Games 2026

esakal

Updated on

Arundhati Choudhary wins gold Commonwealth Games 2026: भारतीय बॉक्सिंगपटूंनी राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद २०२६ च्या ग्लासगो स्पर्धेत केली. भारताने आतापर्यंत बॉक्सिंगमध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य अशा पाच पदकांची कमाई केली. नवी दिल्ली २०१०, गोल्ड कोस्ट २०१८ आणि बर्मिंगहॅम २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन सुवर्णपदकं जिंकली होती. तो विक्रम यंदा मोडला गेला आणि त्यात महिलांच्या ७० किलो वजनी गटात राजस्थानच्या अरुंद्धती चौधरीने सुवर्णपदकाच्या लढतीत इंग्लंडच्या चांटेले रैडचा पराभव केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com