Commonwealth Games 2026: दे दणा दण... पोरींनी जिंकली २ सुवर्ण! प्रीती पवार, जैस्मिन यांचा गोल्डन पंच; तिहेरी उडीत रौप्य व कांस्य...

Preeti Pawar wins gold Commonwealth Games 2026: भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णमय कामगिरी करत देशाची मान उंचावली. प्रीती पवार आणि जैस्मिन यांनी आपल्या-आपल्या गटात एकतर्फी विजय मिळवत भारताच्या पदकतालिकेत दोन सुवर्णपदकांची भर घातली.
Preeti Pawar wins gold Commonwealth Games 2026

Preeti Pawar wins gold Commonwealth Games 2026

Updated on

India boxing gold medals Commonwealth Games 2026: भारताच्या १० बॉक्सिंगपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आपापल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करून पदक पक्के केले. स्पर्धेत शनिवारी भारतीय बॉक्सर नेमकी किती सुवर्णपदकं जिंकतील याची उत्सुकता होती आणि प्रीती पवार व जैस्मिन यांनी सुवर्ण जिंकून सुरूवात दणक्यात केली. महिलांच्या ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात प्रीती पवारने कॅनडाच्या एस. एस. डेलगाडोचा ५-० अशा एकमताने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रीतीने प्रतिस्पर्धीला कोणतीही संधी दिली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

Commonwealth Games
India in Commonwealth Games
Commonwealth 2026
Commonwealth Games 2026 India medal tally after Day 6
Marathi News Esakal
www.esakal.com