Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Sachin Siwach wins gold Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या बॉक्सिंग संघाला पुरुष गटातील पहिले सुवर्णपदक मिळवून देत सचिन सिवाचने दमदार इतिहास रचला.
Sachin Siwach wins gold Commonwealth Games 2026

Sachin Siwach wins gold Commonwealth Games 2026

esakal

Updated on

Sachin Siwach defeats Tryagain Morning Ndevelo: आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या सचिन सिवाचने ( Sachin Siwach) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुषांच्या ६० किलो वजन गटात नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग न्देव्हेलो याचा ३-२ असा पेनल्टी/स्प्लिट डिसीजनने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या फेरीत सचिनचा एक गुण (Point Deduction) कमी करण्यात आला होता, परंतु तिसऱ्या फेरीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत नामिबियन बॉक्सिंगपटूला नॉकडाऊन केले आणि आपला विजय निश्चित केला. या विजयासह पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळाले असून, भारतीय पथकाच्या खात्यातील हे १२ वे सुवर्णपदक ठरले आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com