Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

Sakshi Chaudhary Clinches Gold: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची सुवर्णमोहिम अविरत सुरूच आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या साक्षी चौधरीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
Sakshi Chaudhary wins boxing gold Commonwealth Games 2026

Sakshi Chaudhary wins boxing gold Commonwealth Games 2026

Updated on

Sakshi Chaudhary Bags Boxing Gold, Unnati Sharma Takes Judo Bronze: भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये बॉक्सिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळाले. साक्षी चौधरीने ५१ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या रुबी व्हाईटला पराभूत केले आणि आजच्या दिवसातील तिसरे सुवर्णपदक निश्चित केले. बॉक्सिंगमधील हे चौथे पदक ठरले. तेच ज्युदोत उन्नती शर्माने ६३ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. तिने दक्षिण आफ्रिकेच्या स्काई क्नोएस्टरचा इप्पोन ( Ippon) डाव टाकून एकतर्फी पराभव केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com