

Commonwealth Games
Sakal
India at Commonwealth Games 2026: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आजपासून (ता. २३) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. २३ जुलै ते दोन ऑगस्टदरम्यान हा महत्त्वाचा क्रीडा महोत्सव रंगणार असून, भारताची पदक पटकावण्याची मदार ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग व बॉक्सिंग या खेळांवर असणार आहे. ७४ देशांतील जवळपास तीन हजार खेळाडू या स्पर्धेमध्ये पदकांवर नाव कोरण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहेत.