हॉकी संघाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील अपयशाचे होणार पोस्ट मार्टेम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघ पदकाशिवाय परत आल्यामुळे प्रशिक्षक शुअर्ड मरिने यांच्यासह संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे पोस्ट मार्टेम सध्या सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णधार मनप्रीत सिंग, पीआर श्रीजेश, रुपिंदरपाल सिंग या प्रणुख खेळाडूंनी मंगळवारी हॉकी इंडियाकडे आपले म्हणणे मांडले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत १२ वर्षांत प्रथमच भारतीय हॉकी संघाला पदकाशिवाय परतावे लागले आहे.

प्रशिक्षकांच्याही कामगिरीचे आवलोकन करण्यात येणार असून, गरज भासल्यास योग्य ते पाऊल उचलले जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. भारतीय हॉकी संघाची राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी खराबच झाली यावर हॉकी इंडिया ठाम आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही इतक्‍या निराशाजनक कामगिरीची अपेक्षा नव्हती, असे हॉकी इंडियाचे म्हणणे आहे.

Web Title: Commonwealth Games hockey