

Grand Welcome for Athletes
esakal
नवी दिल्ली: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा रुबाबात फडकवणाऱ्या भारताच्या काही खेळाडूंचे रविवारी मायदेशात आगमन झाले. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मीराबाई चानू, लवप्रीत सिंग, ऋषिकांत सिंग व बिंदियाराणी देवी या वेटलिफ्टर्स पदकविजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमींची झुंबड उडाली.