
Divya Deshmukh biography : जॉर्जियात झालेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आज पार पडला, यामध्ये महाराष्ट्रातील नागपूरची दिव्या देशमुख ही विश्वविजेती ठरली. तिने आपल्याच भारताची खेळाडू कोनेरू हंपी हिला पराभूत केलं. या अंतिम सामान्याचं वैशिष्ट म्हणजे दोन्ही खेळाडू हे भारताचेच होते. त्यामुळे एकप्रकारे भारतच विश्वविजेता होणार होता, हे आधीच निश्चित होतं.
केवळ प्रतीक्षा याची होती की, ३८ वर्षांची अनुभवी कोनेरू हंपी यामध्ये वरचढ ठरते, की अवघ्या १९ वर्षांची दिव्या आपल्या चमकदारी कामगिरीने सर्वांना धक्का देत विश्वविजयी होते. अखेर अटीतटीचा झालेल्या या सामन्यात ७५ व्या चालीनंतर दिव्याने कोनेरू हंपीला पराभूत केलं आणि इतिहास घडवला.
याच पार्श्वभूमीवर आपण जागतिक पटलावर महाराष्ट्राचा मराठी झेंडा फडकवणाऱ्या या युवा खेळाडू दिव्या देशमुख विषयी आपण, तिच्या जन्मस्थानापासून ते विश्वचषकाला गवसणी पर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
दिव्या देशमुख हिचा जन्म नागपूर येथे ९ डिसेंबर २००५ रोजी झाला. तिची आई नम्रता देशमुख आणि वडील जितेंद्र देशमुख हे दोघेही डॉक्टर आहेत. दिव्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलची विद्यार्थिनी आहे. दिव्या ही खऱ्या अर्थाने बुद्धिबळाच्या ६४ घरांची राणी ठरली आहे. महिलां बुद्धिबळपटूमध्ये तिचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं.
दिव्याने वयाच्या पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळास सुरूवात केली. शंकरनगर येथे घराजवळ असलेल्या बुद्धिबळ अकादमीत तिचे वडील डॉ. जितेंद्र व आई डॉ. नम्रताने तिले पाठविले होते. यानंतर २०१२ मध्ये पुदुचेरी येथे ७ वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतून तिला तिचे पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळाले. पुढे २०१३ मध्ये इराणमध्ये झालेल्या ८ वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई स्पर्धेतही तिने विजेतेपद पटकावले.
यानंतर २०१४ मध्ये ८ वर्षे व ५ महिन्यांची असताना दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेल्या १० वर्षे वयोगटाच्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुढे २०१४ नंतर दिव्याने ४० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यात २३ सुवर्ण, सात रौप्य आणि पाच ब्राँझपदके जिंकत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला.
२०२० मध्ये ऑनलाइन झालेल्या चेस ऑलिंपियाडमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाची दिव्या प्रमुख सदस्य होती. २०२३ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ किताबही तिने जिंकला आणि २०२३ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिला दोनदा राष्ट्रीय महिला विजेतेपद मिळाले. तसेच २०२४ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी कझाकस्तान येथे पहिल्यांदा महिला आशियाई विजेतेपदाला तिने गवसणी घातली. अन् मग २०२४ मध्येच २० वर्षे वयोगटाच्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद पटकावले हे तिचे एकूण तिसरे जागतिक विजेतेपद ठरले. आता महिला वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा तिचा सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.